Maharashtra Politics : शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का, फडणवीसांच्या जवळचा माणूस अखेर फोडलाच, उद्या पक्षप्रवेशही होणार…


Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळाले आहे.

आता विधान निवडणुकचे वार वाहू लागले आहे, विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात भाजपला मोठा धक्का दिला आहे.

समरजित घाटगे उद्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पवारांच्या उपस्थितीत ते कमळ सोडून तुतारी हाती घेणार आहेत. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांची घाटगे यांनी भेट घ्यायला सुरवात केली आहे. सतेज पाटील यांची त्यांनी नुकतीच भेट घेऊन राजकीय विषयावर चर्चा केली. Maharashtra Politics

यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीसाठी साथ देण्याची अपेक्षा सतेज पाटील यांच्याकडे व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पश्चिम महाराष्ट्रातील जवळचे सहकारी म्हणून घाटगे यांची ओळख आहे. समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटातील पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पवारांच्या उपस्थितीत ते उद्या पक्षप्रवेश करणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!