Maharashtra Politics : मोठी बातमी! शरद पवारांचा अजित पवारांना धक्का, दादांसोबत गेलेले कार्यकर्ते पुन्हा शरद पवार गटात, म्हणाले, बाप हा…

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.
यंदाची निवडणूक काहीशी चुरशीची असणार आहे. अशातच आता अजित पवार गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अजित पवारांचे लोणावळ्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या सोबत येणार आहेत.
बाप बाप असतो, आमचा बाप दहा दादा तयार करू शकतात. पण ते दादांना शक्य होणार आहे का?, असे म्हणत अजित पवारांच्या समर्थकांनी शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोणावळ्यात अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
कार्यकर्ते म्हणाले की, बाप बाप असतो, आमचा बाप दहा दादा तयार करू शकतात. पण ते दादांना शक्य होणार आहे का?, मुळात दादा जनतेचा नव्हे तर स्वतःचा विकास करायला गेलेत. मात्र आम्हाला संविधान वाचवायचे आहे. यासाठी आम्ही शरद पवारांची तुतारी फुंकतो,. असं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी म्हंटले आहे. Maharashtra Politics
दरम्यान,या कार्यकर्त्यांचा शरद पवारांना पाठिंबा देणं हा अजित पवारांना लोणावळ्यात मोठा धक्का मानला जात आहे. त्यासोबतच येत्या काही दिवसांत लोकसभेच्या निवडणुका येत आहे. त्यामुळे जर कार्यकर्ते नाराज असतील आणि शरद पवारांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवत असतील तर यामुळे अजित पवारांना फटका बसण्याची शक्यता आहे.