Maharashtra Politics : राजकारणातील मोठी बातमी!! राज ठाकरे-फडणवीस-शिंदेंमध्ये गुप्त बैठक, नेमकं घडतंय काय?

Maharashtra Politics : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुप्त बैठक झाली आहे. यात महायुती काही निवडक जागांवर राज ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे मनसेने जाहीर केलेले असतानाच आता राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. महायुतीत पुन्हा एकदा ‘बिनशर्त’ पाठिंब्यावर चर्चा झाली आहे. Maharashtra Politics
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुप्त बैठक झाली आहे. यात महायुती काही निवडक जागांवर राज ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.