Maharashtra Politics : मोठी बातमी! राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार, ताज हॉटेलमध्ये शिंदे-फडणवीसांसोबत बैठक सुरू, दोन जागाही मिळण्याची शक्यता…

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठीबातमी समोर येत आहे. राज ठाकरेंचा मनसे पक्ष कोणत्याही क्षणी महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

मुंबईत राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक सुरु आहे. वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये ही बैठक सुरु आहे. दिल्लीत अमित शाह यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर होणारी ही दुसरी महत्त्वाची बैठक आहे.

राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असून, त्यांना लोकसभेच्या २ जागा दिल्या जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. पण भाजपा मात्र त्यांना एकच जागा देणार असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान महायुतीत सहभागी होताना कोणत्या अटी असतील यावर सगळं अवलंबून असणार आहे. Maharashtra Politics

दरम्यान, मनसेला महायुतीत किती जागा मिळतील? तसंच आमागी विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये काय रणनीती असेल यावरही राज ठाकरे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
