Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं, भेट नेमकी कशासाठी?

Maharashtra Politic : राज्याच्या राजकारण सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येण्यामागे दोन कारणे समोर आली आहेत. पहिले कारण म्हणजे दुकानांवरील मराठी पाट्या. सर्वोच्च न्यायालयाने दुकानावरील मराठी पाट्यांसंदर्भात निर्णयानंतर अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. मात्र मराठी पाट्या तसेच टोलप्रश्नांसंबंधी ही भेट असल्याचे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. Maharashtra Politic

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शनिवार (ता.२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली राज्यात सध्या दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत.


सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मनसेने मराठी पाट्यांसाठी मोहिम सुरू केली असून खळखट्याळचा इशाराही दिला आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच मनसेने टोलबंदी संदर्भात पुन्हा आक्रमक भूमिका घेतली होती. याच महत्वांच्या प्रश्नांवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही भेट झाली सांगितले जात आहे.
मुख्यमंत्र्यानी केली पोस्ट..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी येऊन माझी भेट घेतली. या भेटीत राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणले आहे.