Maharashtra Politics : राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात महत्वाची बैठक, बैठकीत नेमकं घडलं काय? चर्चा सुरू…


Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा या निवासस्थानी ही भेट झाली आहे. यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे वाढते प्रमाण अशा वेगवेगळ्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली आहे.

या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे, आमदार राजू पाटील, वैभव खेडकर, अजित अभ्यंकर, अभिजीत पानसरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मागच्या काही दिवसापूर्वी उरण या ठिकाणी यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या संदर्भात देखील राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे चर्चा केली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. Maharashtra Politics

दरम्यान, मागच्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेवर जोरदार टीका केली होती.

यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!