Maharashtra Politics : अखेर महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?, जाणून घ्या…


Maharashtra Politics : मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर दोन आठवडे होत आले, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यानं महायुतीत खातेवाटपावरून नाराजी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, अखेरीस नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला.

भाजपच्या सर्वाधिक १९ मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या सरकारच्या एकूण ३९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. साताऱ्यात सर्वाधिक म्हणजेच चार कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहे.

यामध्ये भाजपला २, शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी १-१ अशी मंत्रिपदं मिळाली आहेत. भाजपकडून साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले, भाजप माण-खटाव येथून जयकुमार गोरे, शिंदेंच्या शिवसेनेतून पाटणचे शंभूराज देसाई आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे वाईचे मकरंद पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. Maharashtra Politics

पुणे जिल्ह्याला ३ कॅबिनेट तर १ राज्यमंत्रिपद मिळाले आहे. बारातीतून अजित पवार, दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ यांनी मंत्रिपदाची शपथ ग्रहण केली. तर नाशिकमधून तीन जणांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

मालेगाव येथून शिंदेंचे मंत्री दादा भुसे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील सिन्नरचे माणिकराव कोकाटे आणि दिंडोरीतून नरहरी झिरवळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

जळगावातील तीन कॅबिनेट मंत्री नव्या सरकारमध्येही कायम राहिलेत यामध्ये भाजपचे गिरीश महाजन, संजय सावकारे तर शिंदेंच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री झालेत. रायगड जिल्ह्याला अदिती तटकरे आणि भरत गोगावले हे दोन कॅबिनेट मंत्री लाभलेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!