Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का!! निवडणुकीनंतर बडा नेता अजित पवार गटात प्रवेश करणार, थेट घोषणाच केली…


Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली.

शरद पवार गटाचे केवळ १० आमदार निवडून आले. असे असताना निवडून झाल्यानंतर खान्देशातील बडा नेता आता शरद पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. जळगावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. जवळपास ५ हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे गुलाबराव देवकर यांच्यासोबत अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

अजित पवार गटात जाणार असल्याचं गुलाबराव देवकर यांनी सांगितले आहे. माजी मंत्री, जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देवकर यांनी भेट घेतली. Maharashtra Politics

सोमवारी ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या भेटीनंतर प्रवेश सोहळा कधी आणि कुठे घ्यायचा याबद्दलचा निर्णय होईल, अशी माहिती गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.

चिंतन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी सत्तेत जायला हवं असे सांगितले होते. अजित पवार गटात जाण्याबद्दल निर्णय घेतला होता. कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार अजित पवार गटात प्रवेश करत आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातले तसेच जिल्ह्यातले अनेक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, असं गुलाबराव देवकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का पचवत नाही, तोच जळगाव जिल्ह्यात गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते अजित पवार गटात जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!