Maharashtra Politics : अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचा प्लॅन? भाजप-शिवसेना टाकणार गुगली, मोठी माहिती आली समोर…


Maharashtra Politics महाराष्ट्रात सध्या भाजपाप्रणित महायुतीचं सरकार अस्तित्वात आहे. जून २०२२ मध्ये शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीने एकत्र येऊन राज्यात बहुमताचं सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवारांचा गटही या सरकारमध्ये सहभागी झाला.

तसेच ४० आमदार असलेल्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर १०५ आमदार असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर ४१ आमदार असलेले राष्ट्रवादीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या महायुतीत जागावाटपाच्या चर्चा होत आहेत. यासाठी बैठकाही घेतल्या जात आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर या आठवड्यात येणार आहेत.

यावेळी महायुतीच्या नेत्यांसोबत जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगण्यात येत आहे पण महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट अधिक जागांसाठी आग्रही असल्यानं अजित पवार यांना कमी जागा वाट्याला येतील. Maharashtra Politics

अशा परिस्थितीत तडजोड करायची की वेगळं लढायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर असेल. दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवार यांची कोंडी करून त्यांना बाहेर पडण्यासाठी अप्रत्यक्ष रणनीती आखली जात असल्याचे म्हंटले जात आहे.

अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडण्यासाठी वातावरण तयार करण्यात येत असल्याचं सूत्रांनी म्हंटले आहे. विधासनभा निवडणुकीआधी महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अशा वेळी जर अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर भाजप आणि शिंदे गटाला जास्त जागा मिळतील अशी रणनीती आखली जात असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!