Maharashtra Politics : शिंदे गटाच्या आमदाराचे मोठे विधान, म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांचे एन्काऊंटर…’
Maharashtra Politics मुंबई : शिंदे गटाचे नेते, आमदार संजय गायकवाड यांनी मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर करण्याचा डाव होता, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. Maharashtra PoliticsMaharashtra Politics
संजय गायकवाड म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना दुसरे काहीही दिले जाणार नव्हते, त्यांना मृत्यू दिला जाणार होता. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचे एन्काऊंटर केले जाणार होते. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. मी अत्यंत जबाबदारीने हा गौप्यस्फोट करत आहे.
एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. या धमकीनंतर राज्य सरकारने एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला.
ही सुरक्षा देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरी बैठक असताना मातोश्रीवरून फोन आला आणि झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असे सांगण्यात आले. याचा अर्थ काय? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपले होते. त्यांना नक्षलींच्या हातून मारायचे होते. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना सुरक्षा नाकारली, असा थेट आरोप गायकवाड यांनी केला.