Maharashtra Politics : शरद पवार यांना पुन्हा एकदा मोठा धक्का! आता दोन बडे नेते अजित पवारांच्या गटात?

Maharashtra Politics मुंबई : राज्याच्या राजकारणात (Politics Maharashtra) सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरुन नव्याने पक्ष उभारणीला सुरुवात केली आहे. मात्र आता पुन्हा शरद पवार (Sharad Pawar) गटातील दोन बडे नेते अजित पवार (Ajit Pawar) गटाला समर्थन दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Politics Maharashtra
राष्ट्रवादीतील आणखी एक आमदार आणि खासदाराने अजित पवार गटाला समर्थन दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या दोघांनीही आपले प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे दिल्याची माहिती आहे. त्यामुळे ते अजितदादांना समर्थन देणारे ते आमदार आणि खासदार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शरद पवार यांना सध्या लोकसभेतील खासदार अमोल कोल्हे आणि श्रीनिवास पाटील यांचा पाठीबा आहे. तर राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण किंवा फौजिया खान यांनी देखील शरद पवार यांनाच समर्थन दिलं आहे. त्यामुळे या चार खासदारांपैकी समर्थन देणारा तो खासदार कोण? याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.
दरम्यान, शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवा, अशी मागणी अजित पवार गटाकडून याचिका विधिमंडळ कोर्टत केली आहे. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला समर्थन देणारे ते आमदार आणि खासदार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. शरद पवारांना याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो.