Maharashtra Politics : राजकारणातील मोठी बातमी! आता काँग्रेस फुटणार, १५ आमदार अजित पवार गटात जाणार? जाणून घ्या…

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारण अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस पक्षातील काही आमदार फुटीरतेच्या मार्गावर आहेत.
पूर्वी हे आमदार भाजपच्या संपर्कात होते. मात्र, अजितदादा यांच्या सत्तेतील सहभागामुळे त्यांचा प्रवेश लांबला होत. परंतु, यातील काही आमदार आता अजितदादा गटाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आणि वांद्रेचे माजी आमदार बाबा सिद्दीकी हे लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात सामील होतील, अशी सध्या पक्षांतर्गत जोरदार चर्चा सुरु आहे.
इतकेच नाही तर बाबा सिद्दिकी आणि त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दिकी यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता या भेटीनंतर या अशा चर्चा रंगल्या आहेत. Maharashtra Politics
मुंबईमध्ये अजित पवार गटाकडे मुस्लीम मातांना आकर्षित करणारा चेहरा नाही. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांना आपल्याकडे खेचण्याची तयारी अजित पवार गटाकडून केली जात आहे. २० मार्च रोजी मुंबईत राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेच्या समारोप होणार आहे.
त्यापूर्वी पक्ष बदलण्यासाठी या आमदारांना प्रवृत्त केले जात आहे. अशातच अजित पवार गटाच्या एका नेत्याने काँग्रेसचे कमीत कमी १५ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे, असा दावा केला आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.