Maharashtra Police Officer Transfers : राज्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या; संदीपसिंग गिल यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह इतरांचीही बदली….


Maharashtra Police Officer Transfers : गणेशोत्सवाचा बंदोबस्ताची आखणी करण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी गुंतले असताना राज्य शासनाने राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. गणेशोत्सवामध्ये पुणे शहरातील परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त हे अतिशय महत्वाचे पद असते.

राज्य सरकारने पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली करण्यात आल्या असून पुण्याचे नवीन ग्रामीण पोलीस अधीक्षक हे संदीप सिंह गिल असणार आहेत.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. काही वर्षापूर्वी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त म्हणून पुण्यात काम पाहिलेल्या तेजस्वी सातपुते यांनी पुन्हा पुण्यात पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Maharashtra Police Officer Transfers

गिल हे पुणे शहराचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते, तर पंकज देशमुख यांची आता बृहन्मुंबईच्या पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने गुरुवारी या संदर्भातील आदेश जारी केला. यामध्ये बृहन्मुंबईच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर च्या पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

बृहन्मुंबईच्या परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या सहाय्यक पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त निमित्त गोयल यांची बृहन्मुंबईच्या पोलीस उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली असून, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० या सोलापूरच्या समादेशक पदी असलेले विजय चव्हाण यांची सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य पदी बदली करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!