महाराष्ट्राला 713 किलोमीटरचा नवा महामार्ग मिळणार! 15 हजार कोटींची खर्च, ‘या’ शहरातून जाणार मार्ग, जाणून घ्या….


जळगाव : सध्या आपल्या राज्याला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. हा नवीन महामार्ग मध्य प्रदेश, महाराष्ट्र अन तेलंगणा या राज्यांना जोडणार आहे. यामुळे राज्या-राज्यांमधील कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे. यासाठी 15 हजार कोटींची खर्च अपेक्षित आहे.

इंदूरला हैदराबादशी जोडण्यासाठी हा प्रोजेक्ट भारतमला प्रकल्पांतर्गत विकसित केला जाईल. हा प्रोजेक्ट 713 किमी लांबीचा राहणार आहे. हा महामार्ग इंदूर ते बाडवा- बुरहानपूरमार्गे इच्छापूर मार्गे महाराष्ट्र आणि तेलंगणा मधून हैदराबाद असा राहणार आहे. यामुळे दळणवळण वाढणार आहे.

हा महामार्ग इंदौर, बुरहानपुर आणि बाडवा मार्गे मुक्ताईनगर, जळगाव, अकोला, हिंगोली आणि नांदेड या जिल्हातून जाणार आहे. पुढे तेलंगानामधील मंगलूर, रामसनपल्ली, संगारेड्डी असा हैदराबादपर्यंत जाणार आहे. यामुळे येथील उद्योगांना भरारी मिळणार आहे.

यामुळे हैदराबाद दरम्यानच्या महामार्गाच्या बांधकामामुळे आयटी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. यासाठी या महामार्गाची निर्मिती केली जाणार आहे. या रोडमुळे इंदूरमधील व्यापारी त्यांच्या वस्तू सहजपणे दक्षिण भारतात पोहोचवू शकतील. हा महामार्ग प्रकल्प कृषी, पर्यटन, शिक्षण, अध्यात्म आणि औद्योगिक क्षेत्रासाठी मोठा फायद्याचा ठरणार आहे.

दरम्यान, सध्या इंदोर ते हैदराबादचे अंतर 876 किमी इतकं आहे. पण एकदा हा महामार्ग तयार झाला की, हा मार्ग 157 किमीने कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी 3 तासांनी कमी होणार आहे. यामुळे अनेक दृष्टीने हा मार्ग महत्वाचा मार्ग आहे. यामुळे फायदा होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!