Maharashtra Kesari : भारतीय कुस्ती महासंघाने धाराशिव येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यास घातली मनाई! कुस्तीगीर, पंच, प्रशिक्षण यांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही..!!

Maharashtra Kesari पुणे : भारतीय कुस्ती महासंघ (WFI )ने धाराशिव येथे १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान भरविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र केसरी २०२३’ कुस्ती स्पर्धेत खेळणाऱ्या कुस्तीगीर तसेच पंच , कुस्ती प्रशिक्षक यांना या स्पर्धेत सहभागासाठी प्रतिबंध घातली आहे. महासंघाच्या प्रतिबंधानंतरही या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांवर महासंघ शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे अधिकृत पत्र महासंघाने जारी केले आहे. Maharashtra Kesari

भारतीय कुस्ती महासंघाची महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद या संघटनेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस हे अध्यक्ष असलेली संघटना ही अधिकृत आहे. या संघटनेने नुकतीच पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली होती.
ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संलग्नतेवरून दावा करणाऱ्या अन्य एका संघटनेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२३ आयोजित केली आहे. ही स्पर्धा धाराशिव येथे १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. तत्पूर्वी भारतीय कुस्ती महासंघ (WFI ) ने या स्पर्धेत खेळणाऱ्या कुस्तीगीर, पंच तसेच कुस्ती प्रशिक्षकांवर मनाई घातली आहे.

भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस व सरचिटणीस योगेश दोडके यांना पत्रक काढून सहभागींवर मनाई करण्याचे आदेश काढले आहेत. म
हासंघाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर भारतीय कुस्ती महासंघ हा एकमेव पर्याय महाराष्ट्रातील कुस्तीगीरांपुढे असल्याने भारतीय कुस्ती महासंघाचा आदेश डावलुन जर एखादा कुस्तीगीर ,पंच अथवा कुस्ती प्रशिक्षक या स्पर्धेत सहभागी झाला तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ सुध्दा भारतीय कुस्ती महासंघाच्या परीपत्रकाने त्याच्यांवर कारवाई करणार असल्याचे पै. संदिप भोंडवे यांनी म्हटले आहे.