महाराष्ट्रावर अस्मानी संकट, अनेक जिल्ह्यात गारपीट होणार, तसेच ९ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांनो जाणून घ्या हवामान अंदाज…


मुंबई : महाराष्ट्रावर आता दुहेरी संकट आलं आहे. मुंबई ते रायगड, कोकण पट्ट्यात दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. तर दुसरीकडे गारपिट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच ४ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिट, तर ९ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना इथे पावसाच्या हलक्या सरी बरसतील.

परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये २१ मार्च म्हणजेच आज गारपिटसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ४०-५० किमी ताशी वेगाने वादळी वारे वाहतील. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, २२ आणि २३ मार्च रोजी देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता, तरी उन्हाचा चटका मात्र कायमच राहणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!