यंदाच्या अंर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याअंतर्गत पुणे -मिरज , दौंड -मनमाड , बारामती -फलटण रेल्वे मार्गांना छप्परफाड निधी ; महाराष्ट्राला 13,539 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद…!


नवी दिल्ली : अथर्मंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अथर्संकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे . या मुळे आता महाराष्ट्रातील विविध प्रकल्पाना गती मिळणार आहे. २००९ ते २०१४ या काळात १ हजार १७१ कोटी रुपये मिळले होते.

मात्र नवीन सरकार येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी महाराष्ट्राचा रेल्वे प्रकल्पाचा कामाला जोरदार गती दिली असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

दरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना म्हणाल्या, महाराष्ट्राला यंदाच्या 2023-24 अर्थसंकल्पामध्ये पूर्वीपेक्षा ११ पट अधिक निधी राज्यातील विविध रेल्वे योजनांसाठी 13,539 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

त्यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवान , अध्यक्ष सुभाष गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी प्रधान विभागाध्यक्ष तसेच मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि महाराष्ट्रातील इतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्यांच्या संबंधित मुख्यालयात यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील प्रमुख विकासकामांना मिळालेला निधी पुढीलप्रमाणे :

हाराष्ट्रातील  नवीन रेल्वे मार्गांच्या लाईन्स : (1685 कोटी )

  • अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ 250  कि.मी –  201 कोटी
  • वर्धा-नांदेड मार्गे येवतमाळ पुसद 270 कि.मी – 600 कोटी
  • सोलापूर-उस्मानाबाद मार्गे तुळजापूर 84 कि.मी – 110 कोटी
  • धुळे-नरडाणा 50 कि.मी -100 कोटी
  • कल्याण-मुरबाड मार्गे उल्हासनगर 28 कि.मी. -100 कोटी
  • बारामती-लोणंद 54 कि.मी -100 कोटी
  • फलटण-पंढरपूर गेज रूपांतरण 105 कि.मी – 20 कोटी
  • पाचोरा-जामनेर 84 कि.मी -50 कोटी

दुहेरीकरण/ 3री लाइन/ 4थी रेल्वे लाइन मार्गांची कामे  : (2702 कोटी)

  • कल्याण – कसारा 3री लाईन 68 कि.मी – 90 कोटी
  • वर्धा- नागपूर 3री लाईन 76 कि.मी -150 कोटी
  • वर्धा- बल्हारशाह 3री लाईन 132 कि.मी -300 कोटी
  • इटारसी- नागपूर शिल्लक 280 कि.मी  – 310 कोटी
  • पुणे-मिरज-लोंडा दुहेरीकरण 467 कि.मी – 900 कोटी
  • दौंड- मनमाड दुहेरीकरण 247 कि.मी – 430 कोटी
  • वर्धा- नागपूर 4 थी लाईन 79 कि.मी -150 कोटी
  • मनमाड- जळगाव 3री लाईन 160 कि.मी – 350 कोटी
  • जळगाव- भुसावळ चौथी लाईन 24 कि.मी  – 20 कोटी

वाहतूक सुविधा आणि विविध कामासाठी : (173 कोटी)

  • पनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनस फेज-1 टप्पा-1 – 10 कोटी
  • सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्र.10,11,12,13 चा 24 डब्यांसाठीच्या विस्तारासाठी -10 कोटी

पुणे 24/26 डब्यांच्या प्लॅटफॉर्मचा विस्तारासाठी  : (25 कोटी)

  • रस्ता सुरक्षा संदर्भातील कामासाठी ,रोड , ओवर ब्रिज / रोड अन्डर ब्रिज :
  • विक्रोळी आरओबी – 4 कोटी
  • दिवा आरओबी – 5 कोटी
  • बडनेरा वॅगन दुरुस्ती कार्यशाळा – 40 कोटी
  • रत्नागिरी रोलिंग स्टॉक घटक कारखाना – ८२ कोटी

महानगर परिवहन प्रकल्पसाठी :  (1,100 कोटी)

  • (२०२२-२३ मध्ये रु. ५७५ कोटी आणि २०२१-२२ मध्ये रु. ६५० कोटी)
  • बेलापूर-सीवूड-उरण लाईन – 20 कोटी
  • एमयूटीपी  टप्पा-II -150 कोटी
  • एमयूटीपी टप्पा III -650 कोटी
  • एमयूटीपी टप्पा III-A – 300 कोटी

ग्राहकांच्या सुविधेसाठी : (776 कोटी )

  • ट्रॅक नूतनीकरण – 1400 कोटी
  • पुलाचे काम, बोगद्याचे काम -113 कोटी
  • सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनची कामे – 237 कोटी

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!