Maharashtra Farmer : नेते प्रचारात मग्न होते, इकडे निवडणूकीच्या काळात ११८ शेतकऱ्यांनी संपवले आयुष्य, राज्यात भीषण परिस्थिती..


Maharashtra Farmer :  राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. पण याच दरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याच्या ६१ दिवसांत तब्बल ६६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. तर जानेवारी ते एप्रिल या चार महिण्यात १८८ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलायची माहिती समोर आली आहे.

जगाचा पोशिंदा बळीराजा आर्थिक मानसिक कोंडीत असताना शासन, प्रशासन आणि राजकारण्यांचं मात्र दुर्लक्ष होत आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ नापिकी, सावकारांसह बँकांचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा, मुलांची लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

विशेष म्हणजे एकट्या अमरावती जिल्ह्यात मार्च महिन्यात तब्बल ४० शेतकरी आत्महत्या झाल्या आहे. जिल्हाप्रशासन निवडणकीच्या तयारीत व पदाधिकारी राजकारणात व्यस्त असल्याने जगाचा पोशिंदा निवडणूक काळात दुर्लक्षित राहिला आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहे. Maharashtra Farmer

अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत असताना २००१ पासून २०२४ पर्यंत तब्बल ५२९४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

दरम्यान, एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना दुसरीकडे वादळी वाऱ्यासह अवकाळ पावसाने पु्न्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह आवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पाईट परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने पॉलिहाऊसची तीन शेड उद्धवस्त झाली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतात काबाड कष्ट करुन बँकेच्या कर्जावर उभारलेले पॉलिहाऊस डोळ्यासमोर उद्धवस्त झाल्याने शेतकरी हतबल झालाय. सरकारने तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!