Maharashtra Election Result : हवेलीत अशोक पवाराची अक्षरशः धूळधाण; माऊली कटकेंच्या एकट्या वाघोलीत २०,५९९ तर प्रदिप कंद यांच्या गटात ७,५०० चे मताधिक्य…

Maharashtra Election Result उरुळीकांचन : शिरुर -हवेली विधानसभेच्या मतमोजणीत स्वतःच्या शिरुर तालुक्यात २६,८२६ मतांनी पिछाडीवर पडलेल्या विद्यमान अशोक पवार यांची हवेली तालुक्यात धूळधाण उडण्यास सुरुवात झाली असून प्रतिस्पर्धी माऊली कटके यांच्या एकट्या वाघोली गावाने तब्बल २०,५९९ मतांनी मताधिक्य दिले आहे. तर प्रदिप कंद यांच्या बालेकिल्ला असलेल्या पेरणे -वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटात माऊली कटकेंचा विजयी रथ ७,५०० मतांंनी उधारळा आहे. Maharashtra Election Result
शिरुर -हवेली मतदारसंघात दैदिप्यमान विजयाकडे प्रस्थान करीत असलेल्या महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचा विजयी रथ हवेली तालुक्यात दौडू लागला आहे.
नगररस्त्यावरील ११व्या फेरीत लोणीकंद, पेरणे, वाडे – बोल्हाई गटात साधारण ७५०० हजार तर माऊली कटके यांच्या वाघोली गावात २०,५९९ चे मताधिक्य मिळाले आहे. अजूनही उर्वरीत ७ फेऱ्या बाकी असून माऊली कटकेंचा विजयी रथ विक्रमी विजयी गाठणार असल्याची चिन्हे दिसत आहे.