Maharashtra Election 2024 : ब्रेकिंग! मनसे देणार महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला पाठिंबा, राजकीय वर्तुळात खळबळ…


Maharashtra Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी जवळपास ७ हजारपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सध्या सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. त्यातच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी महाविकासआघाडीला मदत करणार असल्याचे जाहीर वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तसेच मनसे आमदार राजू पाटील यांनी नुकतंच अंबरनाथमील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांची भेट घेतली. यावेळी त्या दोघांनी एकमेकांची गळाभेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अंबरनाथमध्ये मित्र म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना नक्की मदत करणार, अशी भूमिका

मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली आहे. तर मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील, याची फक्त खात्रीच नव्हे, तर गॅरंटी आहे, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी दिली आहे.

दरम्यान, अंबरनाथमधील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला आज मनसे आमदार राजू पाटील उपस्थित राहिले. यावेळी अंबरनाथमधील महाविकासआघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे हे देखील याच कार्यक्रमाला आले. Maharashtra Election 2024

या कार्यक्रमात वानखेडे आणि राजू पाटील यांनी स्टेजवरच एकमेकांची गळाभेट घेतली. यानंतर त्या दोघांमध्ये स्टेजवर चर्चा देखील झाली. यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांना वानखेडे यांना मदत करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर ते म्हणाले, राजेश वानखेडे हे माझे मित्र आहेत. त्यात अंबरनाथमध्ये मनसेचा उमेदवारही नाही. त्यामुळे मित्र म्हणून राजेश वानखेडे यांना नक्की मदत करणार, अशी भूमिका राजू पाटील यांनी जाहीर केली. तर याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना विचारलं असता ते म्हणाले, सर्व मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील याची मला खात्री नाही तर गॅरंटी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!