Maharashtra Election 2024 : महाविकास आघाडीची निकालाआधीच मोठी खेळी, ‘असा’ करणार आकड्यांचा गेम, पडद्यामागे नेमकं चाललंय काय?


Maharashtra Election 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विधानसभेसाठी प्रचाराचा धुराळा उडताना बघायला मिळाला होता. पण आता प्रचार होत नसला तरी पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या गोटातून तर प्रचंड घडामोडी सुरु असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत सत्ता स्थापन केली तरी आपण त्यांच्यासोबत असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिंदे गटातही काहीतरी शिजतंय, असा अंदाज आहे.

तसेच दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागलेला बघायला मिळतोय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटातून अतिशय महत्त्वाची माहिती येत आहे. Maharashtra Election 2024

दरम्यान, एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, अपक्ष आणि बंडखोर उमेदवार या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांकडून बंडखोरांना आश्रय देण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे.

राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत ठिकठिकाणी बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जे बंडखोर उमेदवार विजयी होऊ शकतात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जयंत पाटील हे बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधत असल्याची माहिती समोर येत आहे. अपक्ष आणि बंडखोर विजयी होऊ शकतील अशा उमेदवरांवर पुढच्या सरकारची मदत घ्यावी लागू शकते म्हणून सर्व राजकीय पक्षांकडून ही चाचपणी करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!