Maharashtra Election 2024 : मोठी बातमी! पुण्यात महायुती वडगावशेरी व खडकवासला मैत्रिपूर्ण लढणार! दौंडमध्येही सूचना, शिरुर-हवेलीत भाजपची आक्रमक मागणी…

Maharashtra Election 2024 : पुणे जिल्ह्यातील वडगावशेरी व शिरुर -हवेली या विधानसभा मतदारसंघाचा जागा वाटपाचा निर्णय दिल्ली हायकमांडने सोडविल्यानंतर भाजपच्या अंतर्गत गोटातील वाद उफाळून आल्यानंतर वडगावशेरी व खडकवासला मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले असून वडगावशेरीत भाजपकडून जगदिश मुळीक यांना पक्षाने अधिकृतपणे एबी फॉर्म दिल्याची चर्चा असून खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीकडून दत्ता धनकवडे यांना तर दौंडमध्ये वीरधवल जगदाळे यांना अधिकृत अर्ज भरण्याचा सूचना असल्याने शिरुर-हवेलीत भाजपकडून मैत्रिपूर्ण लढत होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी सुरू केली आहे.
राज्यात महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही जागांवर मतभेद आहेत. त्यात पुण्यातील वडगाव शेरी व शिरुर या मतदारसंघात वाटाघाटीत दिल्लीत निर्णय झाला आहे. या वाटाघाटीत दोन्ही जागा राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही मागणीकरुनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय केला होता. Maharashtra Election 2024
अशातच वडगावशेरी व खडकवासला जागांचा मोठा वाद उद्भवला असून राज्यपातळीवर या जागांवर मैत्रिपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. राज्यात दहा जागांवर मैत्रिपूर्ण लढतीची शक्यता असल्याने पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने खडकवासला मतदारसंघात दत्ता धनकवडे व दौंड मतदारसंघात वीरधवल जगदाळे यांना अधिकृत उमेदवारी देण्याचा हलचाली सुरू केल्या आहेत. अशीच स्थिती शिरुर मतदारसंघाची झाली असून भाजप उमेदवारीसाठी शेवटपर्यंत संघर्ष करणारे प्रदिप कंद यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा करुन समर्थकांचा मोठा मेळावा घेतल्याने पक्षाने या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करावी म्हणून भाजपने आता सोशल मिडीयातून आक्रमक मागणी सुरू केली आहे.