Maharashtra Election 2024 : मोठी बातमी! काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, काँग्रेसचे धक्कातंत्र सुरूच…
Maharashtra Election 2024 : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (ता.२६) काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसने पहिल्या यादीत ४८ नावे जाहीर केली होती. तर दुसऱ्या यादीत २३ उमेदवारांची नावे आहेत. श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी हेमंत ओगले यांना तिकीट देण्यात आले आहे. Maharashtra Election 2024
काँग्रेसच्या २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहिर…
भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गांगणे
वर्धा – शेखर शेंडे
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरीश पांडव
कामठी – सुरेश भोयार
भंडारा पुजा ठावकर
अर्जुनी मोरगाव – दिलीप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ अनिल बाळासाहेब मांगुळकर
अर्नी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
वसई – विजय पाटील
कांदिवली पूर्व – काळु बधेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळीवाडा – गणेश यादव
श्रीरामपूर – हेमंत ओगले
निलंगा – अभयकुमार साळुंखे
शिरोळ – गणपतराव पाटील
दरम्यान, आतापर्यंत महाविकास आघाडीकडून १९६ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अर्ज भरण्यासाठी आता दोन दिवस बाकी असताना अजूनही ९२ जागांवर उमेदवार जाहीर करणे बाकी आहे.