Maharashtra Election 2024 : माऊली कटकेंना महाकाल पावला! शिरूर-हवेलीत राष्ट्रवादीकडून माऊली आबा कटके यांना उमेदवारी जाहीर..

Maharashtra Election 2024 : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज दुसरी यादी जाहीर केली आहे. शिरूर-हवेलीमधून माऊली आबा कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माऊली आबा कटके यांच्या समोर महाविकास आघाडीच्या अशोक पवार यांचे आव्हान असणार आहे. तसेच सुनील टिंगरे, काका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या यादीची घोषणा केली. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना घेरण्यासाठी अजित पवार यांनी मोठा डाव टाकला आहे. अजित पवार यांनी निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आता ७ उमेदवारांची यादी जाहीर झाली. एकूण ४५ उमेदवारांची घोषणा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत करण्यात आली आहे. Maharashtra Election 2024
दुसऱ्या यादीत कुणाला मिळाली उमेदवारी?
वडगाव शेरी : सुनील टिंगरे

वांद्रे पूर्व : झिशान सिद्दीकी
अणूशक्तीनगर : सना मलिक
तासगाव : संजय काका पाटील
इस्लामपूर : निशिकांत पाटील
शिरुर : माऊली कटके
लोहा-कंधार : प्रताप पाटील चिखलीकर