Maharashtra Election 2024 : मोठी बातमी! दिवाळीत भाजपने बॉम्ब फोडला, काँग्रेसचा बडा नेता गळाला, राजकीय घडामोडींना वेग..
Maharashtra Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे.अशातच आता ऐन दिवाळीत भाजपने मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे.
प्रचाराची धामधूम सुरू होण्याआधीच भाजपने मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता गळाला लावला आहे. मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते रवी राजा यांनी भाजपात प्रवेश करणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. रवी राजा यांनी आपला राजीनामा थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवला आहे. आपण काँग्रेसमधील ४४ वर्षांचा राजकीय प्रवास थांबवत असल्याचे त्यांनी म्हटले. Maharashtra Election 2024
मुंबईमध्ये रवी राजा हे काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची चांगली कामगिरी राहिली आहे. रवी राजा हे शीव-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते.
मात्र, काँग्रेस पक्षाने गणेश यादव यांना संधी दिली. त्यामुळे रवी राजा यांनी नाराजी व्यक्त केली. रवी राजा हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र, आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत. रवी राजा यांचा सायन-प्रतिक्षा नगर भागात चांगला संपर्क आहे. या ठिकाणी ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते.