Maharashtra Election 2024 : निवडणुकीच्या मतदानापूर्वी शिवसेनेच्या दोन्ही गटात मोठा राडा, प्रचार रॅलीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?


Maharashtra Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे.

मतदानास आता दोन दिवस राहिले आहे. प्रचाराचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्ष मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी रॅली काढत आहे. सोलापूर जिल्ह्यात शिवसेना प्रचार रॅलीत राडा झाला.

बार्शीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक झाली. ही दगडफेक शिवसेना उबाठाकडून झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. Maharashtra Election 2024

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केला आहे. या दगडफेकीमध्ये रॅलीतील दोन महिला जखमी झाल्या आहेत. रॅलीवर दगडफेक केल्याप्रकरणी कृष्णा राजपूत, प्रशांत जाधव, संपत जाधव, शिवाजी जाधव या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या गल्लीत रॅली काढायची नाही, हा इलाका आमच्या मालकीचा आहे, असे आरोप म्हणत आरोपींना वाद घातला. तसेच आरोपी शिवाजी जाधव आणि प्रशांत जाधव यांनी रॅलीवर विटा फेकून मारल्याची नोंद पोलिसांच्या तक्रारीत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!