Maharashtra Election 2024 : महायुतीला धक्का!! महादेव जानकर यांच्यानंतर भाजपाचा आणखी एक घटक पक्ष युतीमधून बाहेर….


Maharashtra Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.

विधानसभेचं बिगुल वाजल्यानंतर महायुतीला पहिला मोठा धक्का बसला होता. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत स्वबळाचा नारा दिला आहे. यानंतर आता आणखी एका घटक पक्षाने महायुतीची साथ सोडली आहे.

आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असून राज्यातील पाच जागांवर निवडणूक लढणार असल्याचं शिवसंग्राम पक्षाने जाहीर केले आहे. शिवसंग्रामच्या ज्योती विनायक मेटे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

तसेच महायुतीची शिवसंग्रामला सोबत घेऊन जाण्याची भूमिका दिसत नाहीत. आमच्या समोर सर्व पर्याय खुले आहेत. राज्यातील पाच जागावर शिवसंग्राम निवडणूक लढवणार आहे. घटक पक्षाला बळ देण्याच तर सोडाच पण सोबत घेऊन जाण्याचं काम देखील भाजप करत नाही त्यामुळे शिवसंग्राम स्वतंत्र भूमिका घेईल असं ज्योती मेटे यांनी सांगितले आहे. Maharashtra Election 2024

दरम्यान, विनायक मेटे यांचं निधन झाल्यानंतर शिवसंग्रामला सत्तेत वाटा मिळाला नाही. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्नही सुटला नाही. शिवसंग्रामचा राजकीय पटलावरती विचार केला नाही. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनाही मिळाला नाही. घटक पक्षाला बळ देण्याच तर सोडाच पण सोबत घेऊन जाण्याचं काम देखील भाजप करत नाही असा घणाघात ज्योती मेटे यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!