Maharashtra Covid Update : कोरोना वाढला!! मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद, काळजी घेण्याचे आवाहन…


Maharashtra Covid Update : संपूर्ण जगभरात धुमाकूळ कोरोनाने २०१९ साली घातला होता. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कित्येक महिने लॉकडाऊन झाल्याने लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

लॉकडाऊन असल्याने अनेकांचे रोजगार गेले होते. लाखो लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता. अशातच आता राज्यासाठी चिंताजनक बाब आहे. कारण राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे.

कोरोनाची ११ नवीन रुग्ण १९ डिसेंबर रोजी आढळून आली आहे. सर्वात जास्त रूग्ण हे मुंबईतील आहेत. या रूग्णांसह आतापर्यंत कोरोनाच्या रूग्णांची संख्या ३५ वर गेली आहे. Maharashtra Covid Update

यापैकी मुंबईत २७ रुग्ण, पुण्यात २ रुग्ण आणि कोल्हापुरात एक रुग्ण एक्टिव्ह आहे. त्याशिवाय होम आयसोलेशनमध्ये एकूण २३ रुग्ण असून एक रुग्ण रुग्णालयात आयसोलेशनमध्ये आहे. जर आता ही रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर अडचणी वाढू शकतात. भारतात कोविड-१९ चे सब-व्हेरियंट JN.1 केरळमध्ये सापडला आहे. Maharashtra Covid Update

यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये आहे. केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतत पाळत ठेवण्यास सांगितली आहे. दरम्यान, आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे एकूण ८०, २३,४०७ रूग्ण बरे झाले असून मंगळवारी एकही कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला नाही. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!