Maharashtra Corona Update : मोठी बातमी! कोरोना वाढला, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या…


Maharashtra Corona Update : देशासह राज्यात कोरोनाने डोकंवर काढले आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंताजनक पसरिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा आता पुन्हा हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे राज्य शासन आणि आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. आरोग्य विभागाकडून संभाव्य धोका लक्षात घेता सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. असे असताना आता राज्य सरकारने देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी आता १६८ वर पोहोचली आहे.

यामध्ये कोरोनाच्या नव्या JN-1 व्हेरिएंटने बाधित झालेल्या १० रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट फार जलद गतीने संक्रमित होणारा आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून काळजी घेण्याचे आवाहन केलं जात आहे. Maharashtra Corona Update

तसेच संभाव्य संकट लक्षात घेता राज्य सरकारने नव्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाकडून पुन्हा एकदा तज्ज्ञ डॉक्टरांची टास्क फोर्स नेमण्यात आली आहे.

काय काम करणार टास्क फोर्स ?

टास्क फोर्सच्या अध्यक्षांनी ठरविल्याप्रमाणे इतर कोणतीही शिफारस.
टास्क फोर्सने केलेल्या शिफारशींचा अहवाल सदस्य सचिव यांनी शासनास वेळोवेळी कळविण्यात यावे.
मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा १०३ वर

गंभीर आणि अतिगंभीर आजारी कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे.
कोविड-१९ क्रिटिकल केअर हॉस्पीटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे.
गंभीरपणे आजारी कोविड-१९ रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे.

दरम्यान, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात आता पुन्हा कोरोना संक्रमणाचा प्रकोप बघायला मिळतोय. मुंबईत काल दिवसभरात तब्बल १९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १०३ वर पोहोचला आहे. दरम्यान, मुंबईत आज दिवसभराच ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!