Maharashtra : अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीने आखली महत्वाची रणनीती, बैठकीत विरोधकांना घेरण्याचा प्लॅन ठरला…
Maharashtra : लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यामुळे आता महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या ताकदीने मैदानात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आता महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनापूर्वी समन्वयाबाबत कोणत्याही प्रकारची नाराजी आणि अडचणी विरोधकांना नको आहेत.
त्यामुळे आज दुपारी १२ वाजता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घरी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी काल काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली होती.
या बैठकीला काँग्रेस हायकमांडमधील अनेक बडे नेते उपस्थित होते. यावेळी महत्वाची रणनीती आखण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती तयार करण्यासाठी काँग्रेसने मंगळवारी आपल्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, देश आता परिवर्तनाकडे पाहत असून, महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत याचा स्पष्ट संदेश दिला आहे. दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि काँग्रेसला आशा आहे की ते चांगली कामगिरी करेल आणि भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना महाआघाडीला सत्तेतून बाहेर काढेल. Maharashtra
दरम्यान, काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यासोबत महाविकास आघाडी युती अंतर्गत लोकसभा निवडणूक लढवली होती. आघाडीच्या अंतर्गत १७ पैकी १३ जागा जिंकून काँग्रेसला त्यांच्या कामगिरीने प्रोत्साहन मिळाले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.