Maharashtra Assembly Election : भाजपची विधानसभा उमेदवारांची पहिली यादी तयार, महायुतीत ५८ जागांचा तिढा कायम…


Maharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. विधानसभेची आचारसंहिता लागायला काही तास बाकी आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने जागावाटप आणि उमेदवारी घोषित करण्याबाबत वेग वाढवल्याचे चित्र आहे. विधानसभेला २८८ पैकी १५० पेक्षा अधिक जागा लढण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला असल्याची माहिती आहे. अशातच भाजपने आपली पहिली यादी तयार केली आहे.

तसेच महायुतीच्या मुंबई आणि दिल्लीत बैठका सुरु आहेत. २८८ पैकी २३० जागांवर महायुतीची चर्चा झाली असून अद्याप ५८ जागांवरील तिढा कायम आहे. हा तिढा सुटताच भाजप ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपाच्या मुख्यालयामध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. यामध्ये जागावाटप, रणनिती आणि लोकांनी दिलेला फिडबॅक यावर चर्चा झाली. निवडणूक जाहीर होताच भाजपा पहिली यादी जारी करणार आहे. कोअर कमिटीने ५० नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.

भाजपा १५० ते १६० जागांवर निवडणूक लढणार आहे. २०१९ मध्ये १६२ जागांवर भाजपाने निवडणूक लढविली होती तर त्यापैकी १०५ जागांवर जिंकले होते. आता थोडी परिस्थिती बदललेली आहे. दोन महत्वाचे प्रादेशिक पक्ष फुटलेले आहेत.

त्यात तिसरी आघाडी आलेली आहे. ही आघाडी कोणाची मते आपल्याकडे खेचते, मराठा आंदोलन, ओबीसी आंदोलन आदी गोष्टींचा या निवडणुकीवर प्रभाव असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!