LPG गॅसच्या दरांत घट, सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त, महागाईत मोठा दिलासा…


पुणे : देशात सध्या एलपीजी गॅसच्या किमतींत घट झाली आहे. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

एलपीजी विकणाऱ्या कंपन्यांनी दर स्वस्त केले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीतही कपात झाली आहे. असे असले तरी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर पूर्वीप्रमाणेच आहेत.

यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत.

पूर्वी हाच सिलेंडर 1856.50 रुपयांना मिळत होता. यामुळे यामध्ये काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सध्या मुंबईत 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडर 1725 रुपयांना विकला जात आहे,

गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसचा दर 1856.50 रुपये प्रति सिलेंडर होता. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!