मोठी बातमी! एलपीजी सिलेंडर धारकांना प्रति सिलेंडरला 200 रुपये मिळणार सबसिडी ; केंद्र सरकार देणार नववर्षात दिलासा…!

पुणे : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात दिवसेंदिवस घरगुती ग्रॅस सिलेंडेरच्या किमतीत वाढ झाल्याने आर्थिक बजेट कोलमडल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. असे असताना केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. सरकारकडून आता एलपीजी गॅसवर सबसिडी दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारने प्रति एलपीजी सिलेंडर साठी 200 रुपये सबसिडी एका वर्षासाठी उज्वला योजना अंतर्गत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 14.2 किलोच्या बारा एलपीजी सिलेंडरवर ही सबसिडी देण्यात येणार आहे. ही सबसिडी या नव्या आर्थिक वर्षा पासून लागू केली जाणार आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. सरकारकडून प्रत्येक सिलेंडरवर 200 रुपयाचे अनुदान मिळणार असल्याने सबसिडीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना वर्षात 2400 रुपयांपर्यंत अनुदान वर्षभरात मिळणार आहे.
1 मार्च 2023 पर्यंत प्रधानमंत्री उज्वला योजनेचे 9.59 कोटी लाभार्थी आहेत. ज्यांना ही सबसिडी मिळणार आहे. या योजनेमध्ये सरकारकडून वर्षभरात बारा सिलेंडर देण्यात येतात. आता सर्वसामान्यांना महागाईच्या झळीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.