Loni Kalbhor : राम, दत्त आणि भगवान शंकर त्रिभूतींची विभूती असलेल्या रामदरा शिवालयात गर्दी ओसंडली! लोणीकाळभोर ग्रामस्थांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीचा श्वर दुमदुमला ..!!


Loni Kalbhor  लोणी काळभोर : आज श्री अयोध्या भुमीत श्रीराम  मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानिमीत्ताने येथील श्री तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लाखोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास आलेल्या रामभक्तांना अरूंद तसेच खड्डेयुक्त रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वहातूक कोंडीचा सामना करावा लागला.

श्री तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात २० ते २२ जानेवारी या कालावधीत सकाळी ८ ते रात्री १२ पर्यंत भजन, सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत दिपोत्सव सोहळा तसेच आज दुपारी अक्षदा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आज सकाळी ९ वाजता लोणी काळभोर गावांतील दत्त मंदीरापासून अपुर्व उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने अबालवृद्ध सहभागी झाले होते. ट्रॅक्टरवर श्री राम यांच्या जिवणातील विविध महत्त्वाचे प्रसंग साकारण्यात आले होते. “जय सियाराम”, “सियावर रामचंद्र की जय” अश्या जयघोषात दुपारी सदर शोभायात्रा रामदरा येथे पोहोचली. अयोध्या भुमीत श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा झालेनंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. Loni Kalbhor

तत्पूर्वी आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास  महामस्तकाभिषेक करून श्रींची आरती करण्यात आली. दुपारी महंत हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते श्री रामाची आरती करण्यात आली.ढोल ताशांच्या गजरात श्रीसमवेेत धुंदीबाबा व मंगलपूूूरी महाराज यांच्या पादूूूकांंची मिरवणूक काढण्यात आली होती. याप्रसंगी तरवडी – रानमळा, केसकरवस्ती, वडकी येथील धनगर समाजबांधवानी गजनृत्य सादर केले.

ढोलाच्या तालावर पडणारे लयबद्ध पदन्यास पाहण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली होती. मिरवणूकीमध्ये लोणी काळभोर, फुरसुंगी गावातील नागरिकांसह पुणे, पिंपरी – चिंचवड, सातारा तसेंच परप्रांतातून आलेले भाविक व पर्यटक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. त्यानंतर भात, आमटी, बुंदीचा महाप्रसाद देण्यात आला. दर्शन घेण्यासाठी व प्रसाद घेण्यासाठी आबालवृद्ध, महिला, तरुण भक्तांची झुंबड उडाली होती.

स्थानिक स्वयंसेवक आलेल्या भाविकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग व्यवस्थित व्हावे म्हणून उपाययोजना करताना दिसत होते. परंतू रामभक्तांच्या अभुतपूर्व गर्दीमुळे वाहणांच्या संख्येतही वाढ झाली होती. यांमुळे जुना मुठा उजवा कालवा ते रामदरा पायथ्याशी असलेले अंबरनाथ मंदिर यादरम्यान वहातूकीची प्रचंड कोंडी झाली होती.

पोलीस प्रशासनासमवेत स्थानिक तरूणांनी विविध रस्त्यावरून वहातूक वळवली त्यामुळे भाविकांना रामदरा येथे पोहोचने काही अंशी सुखकर झाले. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस पथकाचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता  होता. त्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. रात्री उशिरापर्यंत विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!