Loni Kalbhor News : घरासमोर खेळत होता मुलगा, अचानक पिसाळलेला कुत्रा चावला, १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, लोणी काळभोर येथील घटना..

Loni Kalbhor News : घरासमोर अंगणात खेळताना पिसाळलेल्या कुत्रा चावल्याने एका १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रायवडीजवळ असलेल्या टाकेचा माळ परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ओम शिवाजी कांबळे (वय. १४ वर्ष रा टाकेचा माळ, लोणी काळभोर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार व्ही एन जाधव यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. Loni Kalbhor News
मिळालेल्या माहिती नुसार, ओम कांबळे हा नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता. १) घरासमोर खेळत होता. खेळत असताना ओम ला पिसाळलेल्या कुत्र्याने दुपारच्या सुमारास चावा घेतला. त्यानंतर ओमला तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शनिवारी (ता. २) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ओमचा मृत्यू झाल्याचे ससून हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर ओम च्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
याप्रकरणी पोलीस हवालदार व्ही एन जाधव यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.