लोणी काळभोर येथील एका २० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण..


लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील साठे वस्ती परिसरात एका २० वर्षीय तरुणाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने लोणी काळभोर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुदर्शन ज्ञानेश्वर (माऊली) काळभोर (वय २०, रा. साठेवस्ती, तारा सिटी, लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि घटना रविवारी (ता. २१) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने लोणी काळभोर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुदर्शनने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, माऊली काळभोर व त्यांची पत्नी रविवारी एका लग्न कार्याला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बाहेरगावी गेले होते. यावेळी सुदर्शन याने राहत्या घराला आतून कडी लावून घेतली.

हवेलीत आघाडी पॅटर्नला देवेंद्र फडणवीस यांचे बळ ! यशवंत; कारखान्याला करणार मदत

त्यानंतर घराच्या खाली काही विक्रेत्यांनी घराचा दरवाजा वाजवला मात्र घरातून कोणताही प्रतिसाद आला नाही. तसेच फोन हि केले मात्र सुदर्शनने फोन उचलला नाही. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या दुकानदारांनी सुदर्शनच्या वडिलांना फोन करून सांगितले कि, सुदर्शनला फोन लावला तसेच घराचा दरवाजा वाजवला तरीही दरवाजा उघडत नाही.

भीमा नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह अखेर सापडले; घटनेने अख्खं गाव हळहळलं

दरम्यान, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास माऊली काळभोर व त्यांची पत्नी लग्नावरून घरी आले त्यानीही फोन केला मात्र सुदर्शनने फोन उचलला नाही. त्यानुसार त्यांनी लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधला.

पुण्यात वाढलेत चप्पल चोर! तिघांविरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी अजिंक्य जोजारे, पोलीस अंमलदार धेंडे यांनी हातोड्याच्या सहायाने घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी घरातील एका खोलीत सुदर्शनने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. सुदर्शनने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट असून या घटनेचा तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!