Loksabha Election 2024 : अखेर दिल्लीतील बैठकीनंतर महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या….

Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.
यंदाची निवडणूक काहीशी चुरशीची असणार आहे. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपावर चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महायुतीच्या जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रात आले होते.
या दौऱ्यात अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत लोकसभेसाठी ३४-१०-४ असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
किती जागा जिंकू शकता, त्या जिंकणाऱ्या जागांची यादी द्या, असा आदेश अमित शाह यांनी दिला असल्याचीही माहिती समोर येत आहे. आपल्यासोबत जे खासदार आले आहेत त्यांना पुन्हा तिकीट देण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. जरी काही खासदारांना संधी दिली नाही तरी त्यांचं भविष्यात पुनर्वसन करण्यात येईल, अशा शब्द अमित शाह यांनी दिल्याची माहिती आहे. Loksabha Election 2024
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबस सध्या एकच खासदार आहे. मात्र तरीही अजित पवार यांनी जास्तीच्या जागांची मागणी केली आहे. मात्र जिंकून येतील तेवढे मतदारसंघ सांगा, असे अमित शाह यांनी अजित पवारांना सांगितल्याची माहिती देखील समोर येत आहे. बारामती, रायगड, शिरुर, कोल्हापूर या जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादीने केल्याची माहिती मिळत आहे.