लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास..


पुणे : लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दिपक टिळक यांचं पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते. दिपक टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील होते.

त्याचबरोबर अनेक संस्थांचे ते विश्वस्त होते. आठ ते अकरा या कालावधीत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी केसरी वाड्यात ठेवण्यात येईल आणि बारा वाजता वैकुंठ स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

डॉ. दीपक टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू होते. त्यांनी ‘केसरी’चे विश्वस्त संपादकपद भूषवले आहे. डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते.

गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व करणारे स्वर्गीय जयंतराव टिळक यांचे ते सुपुत्र होते. जयंतराव टिळक हे १२ वर्षे संसद सदस्य (राज्यसभा) आणि १६ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष होते.

दीपक टिळक हे स्वर्गीय इंदुताई टिळक यांचे पुत्र. त्या एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या होत्या. सेवा सदन आणि हुजूर पागा सारख्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या त्या मार्गदर्शक होत्या. अशाप्रकारे कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे दीपक टिळक यांना बालपणापासूनच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये रस निर्माण झाला होता.

दीपक टिळक याचे सुपुत्र रोहित टिळक हे काँग्रेसचे नेते आहेत. रोहित टिळकांनी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून २००९ मध्ये निवडणूक लढवली होती, पण त्यांना भाजपच्या गिरीश बापट यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र तेव्हाही त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!