Lok Sabha Election 2024 : एक नाही, दोन नाही तर तरुणाचं तब्बल आठ वेळा मतदान, पोलिसांनी केली अटक, घटनेने देशात खळबळ…

Lok Sabha Election 2024 : देशभरात आज लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा पार पडत आहे. आज देशभरातील ४९ जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन देखील केलं जात आहे.
अशातच आता उत्तरप्रदेशमधील एटा जिल्ह्यातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. या ठिकाणी अलीगंज विधानसभेत १३ मे रोजी झालेल्या मतदानानंतर एका अल्पवयीन व्यक्तीने बनावट मतदान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशातील एटामध्ये एका व्यक्तीनं ८ वेळा मतदान केल्याचा दावा केला आहे. याबाबतचा व्हिडीओही या व्यक्तीनं बनवला होता. अशातच आता संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, मतदान करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगानं केली आहे. यासोबतच या व्यक्तीनं ज्या पोलिंग बुथवर मतदानाचा हक्क बजावला होता, त्या सर्व सदस्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच, उत्तर प्रदेशच्या उर्वरित टप्प्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदारांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Lok Sabha Election 2024
व्हायरल झालेला व्हिडिओ फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातील अलीगंज विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक ३४३ खीरिया पमरनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी एटा जिल्ह्यातील नयागाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
व्हिडिओमध्ये बनावट मतदान करताना दिसणारा तरुण राजन सिंह ठाकूर असून तो खिरिया पमरनचे प्रमुख अनिल ठाकूर यांचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे.
१३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी फरुखाबाद लोकसभा उमेदवार मुकेश राजपूत यांना बनावट मतदान करून एका तरुणाने ८ मते दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एटा जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली होती. सध्या या तरुणाला अटक करण्यात आली असून फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.