Lok Sabha Election 2024 : पुणे मावळ आणि शिरूरमध्ये मतदान यंत्रणा सज्ज, नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन…


Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. तीन टप्प्यांचं मतदान पार पडलं आहे. सोमवारी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

तसेच पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ आणि शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघातील मतदान येत्या सोमवारी होत असून त्यासाठीची प्रशासकीय स्तरावरील यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून एकूण मतदारसंख्या २४ लाख ७९ हजार ७४२ आहे तर मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण तर पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. Lok Sabha Election 2024

मतदारसंख्या २५ लाख ९ हजार ४६१ इतकी आहे त्याचप्रमाणे पुणे लोकसभा मतदारसंघात कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती, शिवाजीनगर, कसबा आणि पुणे कॅटोन्मेंट या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

तर मतदारसंख्या २० लाख ३ हजार ३१६ इतकी आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात १३३९ तर पुणे लोकसभा मतदारसंघात २०१८ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात २५०९ मतदान केंद्रं असणार आहेत .

मतदान जागृतीसाठी उपक्रम..

एकजुटीने .. दूरदृष्टीने चला गाजवू मैदान.., राष्ट्रहितासाठी करायचं मतदान.., लोकशाहीचा करायचा सन्मान.., १०० टक्के हो करायचं मतदान.., लोकशाहीचा करायचा सन्मान.. हा वासुदेवांचा आवाज मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी घुमत असल्याचे दिसते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून शहराच्या विविध भागात मतदान जनजागृती होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!