Lok Sabha Election 2024 : अखेर ठरलं! शांतीगिरी महाराज ‘या’ पक्षातून निवडणूक लढणार, महत्वाची माहिती आली समोर…

Lok Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

अशातच आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वामी शांतीगिरी महाराज महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांसोबत महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
शांतीगिरी महाराज हे महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, कालच शिवसेनाकार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी केल्याने शांतिगिरी महाराज नाराज आहेत.

त्यामुळे आता शांतिगिरी महाराजांनी महाविकास आघाडीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याच्या निर्णय घेतला आहे. नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यावर शांतिगिरी महाराज ठाम आहेत. यासाठी महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. त्यांनी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. Lok Sabha Election 2024

तर, दुसरीकडे शिंदे गटाचे नेते तथा नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. असे असतांना शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा श्रीकांत शिंदे यांच्याकडून करण्यात आली.
त्यामुळे महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने शांतिगिरी महाराज यांच्याकडून आता महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याची हालचालींना वेग आला आहे.