Lok Sabha Election 2024 : फडणवीस तुम्ही टुकार आणि नेभळट गृहमंत्री’, दत्तात्रय भरणेंच्या व्हिडिओवरून संजय राऊत यांनी फडणवीसांना घेरलं


Lok Sabha Election 2024 : राज्यात आज अनेक ठिकाणी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. असे असताना इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ केलेला व्हिडीओ कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

यामध्ये ते मतदाराला धमकावत असल्याचे दिसून येत आहे. यावरून सध्या राज्याचे वातावरण तापले असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

बारामतीत होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भरणेंचा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. तुम्हाला माझ्याशिवाय कुणीही नाही. तो बारामती अॅग्रोचा कुणीही येणार नाही, असे दत्तात्रय भरणे म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. तसेच त्यांनी शिवीगाळ देखील केली आहे.

दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत असून बारामती लोकसभा मतदारसंघात ते सुनेत्रा पवांरासाठी प्रचार करत आहेत. मात्र या व्हिडिओमुळे आता अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. Lok Sabha Election 2024

संजय राऊत यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, ही दादागिरी कोणाच्या जीवावर सूरू आहे? मतदान केंद्रावर धमक्या देणे, शिव्या देणे. गावात कसा राहतो ते बघून घेतो ही भाषा कोणाच्या जीवावर सुरु आहे? फडणवीस तुम्ही टुकार आणि नेभळट गृहमंत्री आहात.

महाराष्ट्राची तुम्ही वाट लावलीत. मराठी माणूस तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात ठेवा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता यावर अजित पवार आमदार भरणे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!