Lok Sabha Election 2024 : फडणवीस म्हणाले आमचे ‘हे’ उमेदवार फकीर आहेत, पण शपथपत्रातून तर कोट्यवधीच निघाले, नेमकं कोण आहेत हे उमेदवार, जाणून घ्या…

Lok Sabha Election 2024 : स्वतःला फकीर म्हणणारे महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रामधून समोर आली आहे. त्यांच्याकडे सोने-चांदीचे दागिने, जमीन, एफडी, गोल्ड बाँड स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे.
त्यांच्याकडे एकूण पाच कोटींची संपत्ती आहे. महादेव जानकर मूळचे पळसवाडी जिल्हा सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यांनी शपथपत्रात आपला व्यवसाय शेती हा दर्शविला आहे.
जाणकारांच्या नावावर अठरा एकर १४ गुंठे एवढी शेती आहे. त्यांच्याकडे चल आणि अचल दोन्ही मिळून जवळपास पाच कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामुळे स्वतःला फकीर म्हणणाऱ्या महादेव जानकर यांच्याकडे कोट्यावधी रुपयाची संपत्ती असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
महादेव जानकर यांनी आपले निवडणूक अर्ज भरताना प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यात त्यांनी आपले उत्पन्न दाखवले आहे. सन २०२२-२३ मध्ये त्यांचे उत्पन्न ४० लाख १९ हजार ९९० एवढे आहे.
तर २०२१-२२ मध्ये ३१ लाख ३८ हजार ४० रुपये, २०२० -२१ मध्ये २७ लाख ४० हजार ७५० रुपये, तर २०१९ -२० मध्ये ३१ लाख ७७ हजार ९४२ रुपये आणि २०१८- १९ मध्ये २६ लाख २६ हजार ६३९ रुपये एवढे उत्पन्न दर्शविण्यात आले आहे. महादेव जानकर यांच्याकडे चलसंपत्ती एक कोटी २५ लाख दहा हजार ५९८ रुपये एवढी आहे. Lok Sabha Election 2024
यामध्ये त्यांच्याकडे कॅश इन हॅन्ड २७ हजार ३३० रुपये आहेत. तर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ५१ लाख ६६ हजार ७७९ रुपयाची एफडी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गोल्ड बाँड स्कीममध्ये 791 ग्रॅम सोन्यात गुंतवणूक केली आहे. त्याचे मूल्य २९ लाख ९६ हजार ३००८ रुपये एवढे आहे.
जानकर यांनी पीपीएफ खात्यात २०१९-२० साठी दीड लाख रुपये तर मार्च २०२४ मध्ये दोन लाख २५ हजार ८४५ रुपये आहेत. जानकरांकडे २०० ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने असून त्याचे बाजारमूल्य १३ लाख ६५ हजार एवढे आहे. सर्व अचलसंपत्ती एक कोटी २५ लाख १० हजार ५९८ रुपये एवढी आहे.
महादेव जानकर यांच्याकडे अचल संपत्ती देखील तीन कोटी ६२ लाख ९९ हजार ७६० रुपये एवढ्या किमतीची आहे. त्यामध्ये महादेव जानकर यांच्याकडे शेत जमीन, रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी आणि कमर्शियल प्रॉपर्टी याचा समावेश आहे.
जाणकारांची शेतजमीन सातारा, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, बीड, सिंधुदुर्ग रायगड या ठिकाणी आहे. तर अ कृषिक जमीन हे सोलापूर, जालना या जिल्ह्यात आहेत. जाणकारांच्या कमर्शियल आणि रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी देखील आहेत.
त्या रायगड, पुणे ,अहमदनगर, मुंबई या ठिकाणी आहेत. जाणकारांची चल आणि अचल हे द्य दोन्ही संपत्ती मिळून जवळपास त्याचे बाजार मूल्य पाच कोटी रुपयांचे होत आहे.