Lok Sabha Election 2024 : शिरूरमध्ये राजकीय वातावरण तापलं! अमोल कोल्हेच्या विरोधात बॅनर, पाच वर्षात काय केल?
Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीत सध्या शिरूर लोकसभा मतदार संघाची जोरदार चर्चा सुरू आहे. याठिकाणी अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
असे असताना आता शिरूरमध्ये एक पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यावर लिहिलं आहे की, आम्हा शिरूर करांची मागणी आहे, तुमची पाच वर्षात शिरूरकरांसाठी काय केलं. कृपा करून सांगा, शिरूरकर अस त्यावर लिहिलं आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
हा बॅनर अमोल कोल्हे यांच्याविरोधात असल्याचे सांगितले जात आहे. आढळराव पाटील यांच्या गटाने अस केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. हा पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आता विद्यमान खासदार याला काय उत्तर देणार हे लवकरच समजेल. दरम्यान, शिरुरमध्ये महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिल्यानंतर शिरुर लोकसभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. Lok Sabha Election 2024
याठिकाणी उमेदवार जाहीर होण्यापासूनच अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. यामुळे हा मतदार संघ चर्चेत आला आहे. आता शरद पवार यांच्या सभा देखील याठिकाणी होणार आहेत. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता मतदान किती होणार हे 7 तारखेला समजेल.