Lok Sabha Election 2024 : सट्टा बाजारात तंतोतंत जुळणारा अंदाज आला समोर, भाजपला किती जागा मिळणार, वाचा देशाचा कल…

Lok Sabha Election 2024 : सध्या सर्वांचे लक्ष लागलेला लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर आला आहे. चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याच पार्शभूमीवर राजस्थानातील फलोदी शहर सट्टा बाजारातील अचूक अंदाजासाठी भारतातच नव्हे, तर संपूर्ण आशियात प्रसिद्ध आहे.
मिठाचे शहर म्हणूनही फलोदीची ओळख आहे. याच फलोदीच्या सट्टाबाजारात लोकसभा निवडणुकीच्या निकालावर लाखो, करोडो रुपयांचा सट्टा लागला आहे. या सट्टाबाजाराने केंद्रात पुन्हा बहुमताने भाजप व एनडीए आघाडीचे सरकार येणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नरेंद्र मोदी तिसर्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, यावर सर्वात कमी १ ला ३ असा भाव लागलेला आहे. भाजपला अब की बार ४०० पार नाही, पण ३६० ते ३६५ जागा मिळतील, असा अंदाजही फलोदी सट्टाबाजाराने व्यक्त केला आहे.
तसेच सुमारे ५०० वर्षांची परंपरा लाभलेला फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज तंतोतंत जुळतो, असा आजवरचा इतिहास आहे. कमी भाव म्हणजे, विजयाची खात्री आणि जास्त फायदा असे सट्टाबाजाराचे गणित आहे. स्वातंत्र्याच्या आधी कितीतरी वर्षांपासून फलोदीत सट्टा लावण्याची परंपरा सुरू आहे. Lok Sabha Election 2024
सुरुवातीच्या काळात कापूस, पीक, पाणी पावसाचा अंदाज, दोन वळूंची झुंज यावर सट्टा लागत होता. काळानुरूप बदल होऊन आता क्रिकेट सामने आणि निवडणुकांवर सट्टा लावला जात आहे. सट्टा बाजारातील ही उलाढाल करोडोंच्या घरात गेली आहे. मुंबईतील सराफा बाजार, जव्हेरी बाजार, अरांडा बाजार आणि शेअर मार्केट हे फलोदी सट्टाबाजाराचे मूळ उगमस्थान आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. पारंपरिक सट्टा बाजाराने आता ऑनलाईन स्वरूप धारण केले आहे. सहाव्या टप्प्याच्या मतदानानंतर भाजप ३२९ ते ३३२ जागा जिंकणार व एनडीए आघाडीला ३६० ते ३६५ जागा मिळतील, असा अंदाज फलोदी सट्टाबाजाराने वर्तविला आहे. काँग्रेस व इंडिया आघाडीला १४० ते १६० जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे.