Lok Sabha Election 2024 : एक मराठा लाख मराठा म्हणत तरुणाने पेटवले मतदान मशीन, घटनेने उडाली खळबळ, नेमकं घडलं काय?

Lok Sabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याच पार्शभूमीवर सांगोला तालुक्यात मतदाराकडून मतदान मशीन पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील एका मतदार केंद्रावर हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला असून मतदान मशीन पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित तरूणाला अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे.
हा प्रकार करणाऱ्या संबंधित तरूणाकडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात येत होत्या. इतकंच नाहीतर मतदार केंद्रावर ठेवण्यात आलेल्या मतदान मशीन बोगस असल्याचा आरोपही त्या तरूणाने केला. यावेळी तरूणाने मतदानाच्या मशीनवर पेट्रोल टाकून त्या जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. Lok Sabha Election 2024
मात्र अधिकाऱ्यांनी वेळेच धाव घेत हा धक्कादायक प्रकार रोखला आणि त्या तरूणाला पोलिसांच्या हवाले केले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदार पार पडत आहे. राज्यातील ११ जागांवर मतदान प्रक्रिया सुरू असताना कुठे उत्साह तर कुठे शुकशुकाट पाहायला मिळत आहे.