पुन्हा लॉकडाऊन? पुन्हा महामारी? जगभरात भयंकर रोगाने उडवली अनेकांची झोप, तज्ञांचा भयंकर इशारा….

नवी दिल्ली : कोरोना म्हटलं की सगळ्यांना लॉकडाऊन आठवत संपूर्ण जग एकदम शांत झाले होते. अनेकांचे जीव गेले. यामुळे ही परिस्थिती पुन्हा कधी येऊ नये अशी अपेक्षा अनेकजण करत आहेत. मात्र एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या काळात जग बंदिस्त झाले होते आणि याचा फटका कित्येकांना बसला आता पुन्हा एकदा एचएमपीव्ही, मंकीपॉक्स अशा कोणत्याही आजाराने जगभरात पुन्हा महामारी पसरू शकते. अशी माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिकृतपणे माहिती समोर आली नसती तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनमधील घडामोडींवर बारकाईने चर्चा सुरू आहे. चीनमध्ये एचएमपीव्हीमुळे सध्या अनेक दवाखाने गर्दीने फुलून गेले आहेत. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच स्मशानभूमीमध्ये देखील गर्दी दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील देश अलर्ट झाले आहेत. भारतातही राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेने वैद्यकीय यंत्रणेला या संदर्भात अलर्ट केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय होणार याची भीती अनेकांना आहे.
दरम्यान, 2019 ते अगदी 2022 पर्यंतचा काळ कोरोनाने संपूर्ण जगाला प्रभावित केले. एक कोटी पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू आणि 40 कोटी लोकांना उध्वस्त करणारा कोरोना जागतिक महामारी ठरला. यामुळे याची धडकी जगभराने घेतली.
दरम्यान, आता पुन्हा एकदा एचएमपीव्ही, मंकीपॉक्स अशा कोणत्याही आजाराने जगभरात पुन्हा महामारी पसरू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात काळजी घ्यावी लागणार आहे. याबाबत देश अलर्ट झाले आहेत.