लोकेशन समजलं, आता ड्रोनच्या मदतीने स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा शोध सुरू…

पुणे : येथील स्वारगेट बस डेपोच्या आवारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. तरुणीवर अत्याचार करण्यात आल्यानंतर आरोपी कुठं गेला हे आता समोर आले आहे.
आरोपी मुळचा शिरूर तालुक्यातील रहिवाशी असून आरोपीचा सध्या पोलिसांकडून ड्रोनच्या साहाय्याने शोध घेतला जात आहे. आरोपी पुण्यात दुष्कृत्य करून आपल्या गावात परतला होता. संध्याकाळी पाचपर्यंत तो घरीच थांबला होता. नंतर तो घरून पळून गेला असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पोलीस त्याच्या मागावर आहेत.
आरोपी शिरुरमध्येच शेतात लपला असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. याबाबत कसून चौकशी केली जात असून माहिती देणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपये दिले जाणार आहेत. आरोपीवरती पुणे अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत.
आरोपी सध्या फरार झाला असून त्याचा पोलीस कसून तपास करत आहेत. पोलीस स्थानिकांची मदत घेत आहेत. आरोपीचे लोकेशन सापडले असून ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात आहे. त्याला लवकरच ताब्यात घेण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. ही घटना लपवण्याचा प्रयत्न झालेला नाही, तर केवळ गुप्तता पाळण्यात आली होती.
याचे कारण, जर बातमी लगेच बाहेर आली असती, तर आरोपी दत्तात्रय गाडे सावध झाला असता आणि फरार झाला असता. त्यामुळे पोलिसांनी ही माहिती काही काळ गुप्त ठेवली, अशीही माहिती समोर आली आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल आणि संपूर्ण सत्य बाहेर येईल, असे स्पष्टीकरण योगेश कदम यांनी दिले.