Leopard in Pune : पुण्यातील महावितरण कार्यालात बिबट्याने घातला राडा! उडाली धांदल, कर्मचाऱ्यांनी ठोकली धूम…


Leopard in Pune : पुणे शहरात आज चक्क बिबट्याचे दर्शन घडल्याने पुणेकरांच्या सर्वसामान्य सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी पुण्यात रानगवा आल्यामुळे पालिका प्रशासन व वन विभाग खडबडून जागे झाले होते.

आता, चक्क बिबट्याने महावितरण कार्यालयात हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर, काहींनी बिबट्याला वाहून भुवयाही उंचावल्या होत्या. पुण्याच्या राजगुरुनगर येथील महावितरण कार्यालयात भरदुपारी बिबट्या शिरल्याने कार्यालयातील सर्वांचीच घाबरगुंडी झाली.

विशेष म्हणजे कार्यालय कामकाज सुरू असतात बिबट्या कार्यालयात घुसल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. अनेक कर्मचारी आपलं कार्यालय सोडून बाहेर पळाल्याचं पाहायला मिळालं. येथील महावितरण कार्यालयातील मीटर टेस्टिंग विभागात महिला कर्मचारी काम करता असताना बिबट्याची एन्ट्री झाली होती. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता.

महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून तात्काळ वनविभागाला पाचारण करण्यात आलं होतं, बिबट्या कार्यालयात आल्याची माहिती देण्यात आल्यानंतर वन विभागाने घटनास्थळी धाव घेत मोठ्या मेहनतीने बिबट्याला जेरबंद केलं.

तत्पूर्वी बिबट्याला पाहण्यासाठी महावितरण कार्यलयात गर्दी केलेल्या नागरिकांनी बिबट्याला पाहून एकमेकांची चांगलीच मजा घेतली. तसेच, ये पुढे जाऊ नका तो जंप मारंल, ऐ लय मोठा हाय की.. असा संवाद तेथील नागरिकांचा ऐकू येतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!