धक्कादायक! ‘जेवायला जातो’ सांगून घराबाहेर पडला; पुण्यातील 28 वर्षीय तरुणाची अटल सेतूवरून समुद्रात उडी


पुणे : अटल सेतू परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून 28 वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली असली तरी अद्याप तरुणाचा मृतदेह सापडलेला नाही.

ही घटना रविवारी (7 जून) मध्यरात्री सुमारे 1 वाजून 29 मिनिटांनी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने घरच्यांना आपण बाहेर जेवायला जात असल्याचे सांगून घर सोडले. त्यानंतर तो कारने थेट अटल सेतूवर गेला आणि तेथून समुद्रात उडी मारल्याचे समोर आले आहे.

या घटनेतील तरुणाचे नाव प्रतीक सुभाष रासकर असून तो पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी आहे. तो शेअर बाजाराशी संबंधित प्रशिक्षण कार्यात सहभागी असल्याची माहिती आहे. घटनेच्या वेळी त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट व ग्रे रंगाची पॅन्ट परिधान केली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून अद्यापही तपास सुरू आहे. तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस सर्व शक्य त्या बाजूंनी तपास करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी तरुणाचे वर्णन जाहीर केले असून कोणालाही त्याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!